अभिप्राय

अरबाज शेख

नमस्कार, मी अरबाज शेख ,आनंदपीठ कॅम्प

श्री. संजय आवटे सर तुम्ही आम्हाला ह्या नव्या जगाशी मैत्री करून दिला. आणि त्यामुळे विविध आचार , विचार संस्कृती आणि जाती धर्माचे नवीन मित्र-मैत्रिणी झाले . त्याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना आणि नामावंत व्यक्तींना बोलवून त्यांचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविले . त्या मान्यवरांसोबत आमची ओळख करून दिली. आनंद पिठाच्या टीमचे होलेंटीयर्स तर मला असे वाटत होते एका वेळे देवा कडून चुकी होऊ शकते पण जे तुम्ही संयोजक (वालेंटियर) निवडलेले होते त्यांच्या कडून एकही चूक झाली नाही. सर तुम्ही आमच्या साठी घेतलेली मेहनत आम्ही कधीच विसरणार नाही. आमच्या साठी चांगले चांगले जेवण आणि आम्हाला राहण्याची सोय केली आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही आम्हाला येण्या जाण्यासाठी गाडीची सोय केली. कॅम्पच्या ठिकाणी आठवडाभर आमची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांना त्या ठिकाणी मुक्कामी बोलवून घेतले. आनंदपीठचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद टीम आनंदपीठ आम्हाला नवे जग दाखवून दिल्याबद्दल.