आनंदपीठ आणि साथी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामानाने आनंदपीठ येथे 13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी शिबिर झाले.
आनंदपीठ आणि साथी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामानाने आनंदपीठ येथे 13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी शिबिर झाले.
शिबिराचे उद्घाटन संभाजी भगत यांच्या हस्ते झाले. समारोप जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते झाले.
चार दिवसाचे शिबिर साथी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा राजेंद्र भोसले आणि आनंदपीठाचे संकल्पक संजय आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
कॅम्पमध्ये दररोज सकाळी अभिषेक पालेकर यांनी मेडिटेशन आणि योगासन यांचे प्रात्यक्षिक घेतलं,
पहिल्या दिवशी शीतल यशोधरा यांचे संविधान आणि आपण यावर सत्र झालं. दुपारच्या जेवणानंतर हर्षल पाटील यांनी अभिनय, स्पष्ट वक्तृत्व यावर सत्र घेतलं. सायंकाळपर्यंत मुलांनी त्यांच्या कल्पनेतून स्वतःच एक नाटक बसवलं. शुभेच्छा दुसऱ्या दिवशी सचिन निंबाळकर यांचा चित्रकला यावर सत्र झालं, त्यामध्ये मुलांनी ड्रेसिंग पेपरवर उत्तम चित्र रेखाटले, विदुर महाजन यांच्या सतारी वादनाचे सत्र मुलांना विशेष भावले राग यमन शास्त्रांमध्ये मुलांसह स्वयंसेवकही भारावून गेले. त्यानंतर अपूर्ण महाजन यांच्या चित्ररूपी गोष्टीत मुले दंग झाली. सायंकाळी संजय आवटे यांची सत्र झाले. यामध्ये गांधी नेहरू आंबेडकर यांनी घडवलेल्या भारत आणि आताचा भारत यावर मुलांनी चिंतन केले. सायंकाळी शीतल सोनवणे यांचे अर्थशास्त्र या विषयावर सत्र झाले. आपल्या घरातील कुटुंबाच्या बजेट पासून ते राज्य आणि देशाच्या बजेट पर्यंत वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मुलांना समजावून सांगितल्या. सायंकाळी साथी प्रतिष्ठानच्या मुलांनी चळवळीतील गाणी सादर केले. शाहीर आणि सादर केलेल्या शाहिरीने कार्यक्रम टिपे ला पोहोचला. याच दिवशी शिबिरार्थी वैष्णवी आणि कॅम्प डायरेक्टर दीपक होमकर यांचा वाढदिवस केक कापून जल्लोषात सादर करण्यात आला.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी मला पहाटे नेचर वॉक आयोजन करण्यात आले. अनिकेत मोताळे यांनी परिसरातील झाडांच्या प्रजाती, पक्ष्यांचे प्रकार, पानवटे यांची माहिती दिली. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्राची वाटप झाले.
सायंकाळी डॉ. नीरज जाधव यांचे मुलांचे आरोग्य या विषयावर सत्र झाले. त्यानंतर आशुतोष शिर्के आणि राजीव तांबे यांचे सत्र झाले.
त्यानंतर मानसशास्त्राची विद्यार्थी करण, निशा, धनश्री यांनी मानसशास्त्रावर प्रात्यक्षिक आणि सत्र घेतले यामध्ये मुलांनी त्यांच्या मनात असलेली गुपिते शेअर केली.
सायंकाळी साथी प्रतिष्ठानच्या कलावंतांनी गाणी नाटक सादर करत शिबिरामध्ये सांस्कृतिक रंग भरला.
चौथ्या आणि समारोपाच्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता तिकोना गड सर करण्यासाठी मुले गावाच्या दिशेने चालू लागली. बालवाडी गावातून बसचा प्रवास सुरू झाला. बस मध्येच गडाकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे दुमदुमायला लागले. गडाच्या पायथ्याशी बस थांबली तिथे नाश्ता झाल्यावर शिववंदना गाऊन मुलांनी पायी गडसर करायला सुरुवात केली. साधारणतः दीड तासांमध्ये सर्व मुले गडावर पोचली.
दुपारी परतल्यावर निरोप समारंभाचे गोडाधोडाचे जेवण झाले. त्यानंतर साथी प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र भोसले यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. रात्री आठच्या सुमारास मुले शिबिरातून बसने रवाना झाली.
