कॅम्प

मैत्रीदिनी सहजीवन युथ कॅम्प

आनंदपीठाचा यूथफुल कॅम्पः मैत्री दिनी साजरा झाला सहजीवन आणि मैत्री यूथ कॅम्प!

१९ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी आनंदपीठाच्या माध्यमातून सहजीवन- मैत्री यूथ कॅम्पचे आयोजन. तरुणांमध्ये प्रेम, सद्भावना, आदर जिव्हाळा या मूल्यांची पेरणी करण्यासाठी झालेला रसरशीत निवासी कॅम्प.

इंदुमती जोंधळे आणि महावीर जोंधळे या आंतरजातीय लग्न केलेल्या ज्येष्ठ जोडप्याने, तर विशाल विमल आणि डॉ. आरजू तांबोळी या आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडीने तरूणाईशी गप्पा मारल्या. डॉ. नीरज जाधव आणि डॉ. चेतना जाधव ही डॉक्टर जोडी समुपदेशनासाठी होती. मानसशास्त्रज्ञ प्रा. सृष्टी रावणगावकर यांनीही व्यक्तिगत समुपदेशन केले.

सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुक्त चित्रकार सचिन निंबाळकर सोबत होतेच.

जोडीदाराला समजून घेताना - एक भनाट कपल कॅम्प

संपर्क

8805246008, 9021274477

कुठे

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर. कालवण खोऱ्यामधला डोंगरावर. बाजूला लोहगड, तिकोना, तुंग असे गडकिल्ले. पतंग झेप तर आपली पंखांवर!

कोणासाठी

वय 21 पूर्ण

कल्पना काय?

आपल्या आयुष्याचा संचालक हात आहे, असं वाटू लागतं. पण, उपाय मिळत नाहीत. जोडीदाराला समजून घ्यायचंय, मात्र, तरी झळा पत्कराव्या लागतात. तरी मैत्री, स्पेसही मिळत नाही.

मग, तुम्ही दोघे इथे या. समजून घ्या एकमेकांना.

फेकून द्या ती रोजची कोडी. बाहुबलीची आणि सवांदाचीही. छान डोंगराच्या कुशीतल्या गावात या. आईबाबांना पळव, पलिकडे चला. धावपळ कोसळणारा सिंध थांबवून, निरागस हिरवं दूर सर्वदूर उम. अंधारात चमकणारा कोजागिरी जिथे-तिथे फुलायचं आहे.

एकमेकांना वेळ द्या. समजून तरी घ्या. समुपदेशनाची सेशन सोबतीला. तज्ज्ञ-अभ्यासक मिळतील. सेवेतील प्रेमक त्रिकोण निर्माणी. मार्गदर्शन करणारी मानवी साथही. हे ‘प्लान’ पूर्ण तुमचं तुम्ही ठरवलेलं.

आनंदपीठ कॅम्प कोळवण

कोळवण येथे आनंदपीठाच्या वतीने यशस्वी कॅम्पचे आयोजन

कोळवण खोऱ्यातील विद्यार्थ्यांकरिता तीन दिवसीय आनंदपीठ कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र, मुख्याध्यापिका ढगे मॅडम आणि लोकमतचे संपादक संजय आवटे सर

कॅम्पमधील विद्यार्थ्यांसोबत संविधान साक्षरतेबाबत संवाद साधताना आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करताना संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र.

आनंदपीठ कॅम्प कोळवण उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना लोकमतचे संपादक संजय आवटे सर.

मुख्याध्यापिका ढगे मॅडम विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना.

आनंदपीठ कॅम्प @भालगुडी डेज

आनंदपीठाचे उद्घाटन २२ मे २०२५ या दिवशी झाले. सोनम वांगचुक यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याचसोबत जे पहिले शिबिर आपण घेतले, त्या शिबिरामध्ये मुला-मुलींशी गप्पाही मारल्या.

पहिल्या शिबिराला सुमारे साठ विद्यार्थी आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी आले. महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यांमधून साठ विद्यार्थी आले. तेरा ते एकोणीस या वयोगटासाठी हा कॅम्प होता. त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती.

या शिबिरामध्ये सोनम वांगचुक, अरुण शर्मा, संभाजी भगत, डॉ. हमीद दाभोलकर, अनिकेत मोताळे, आशुतोष शिर्के, संजय आवटे, सरफराज अहमद, शाहू पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुला मुलींशी संवाद साधला. शिबिरातील मुलांची निवड आपण मुलाखतीतून निश्चित केली होती.

हा होता समर कॅम्प. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सगळे चित्र बदलले. तरीही हा कॅम्प अधिक यशस्वी झाला. कारण आपत्तीमधून ही मुलं बरंच काही शिकली. आजही ही सर्व मुलं संपर्कात आहेत.

संपर्क

+९१ ९०२१२७४४७७

कुठे

सह्याद्रीच्या कुशीतल्या कोळवण खोऱ्यात. भालगुडी नावाच्या टुमदार गावातल्या डोंगरावर. पुण्याच्या ©हिंजवडीपासून आणि लोणावळ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर. पवना डॅमपासून अर्धा तास, तर हाडशी तलावापासून हाकेच्या अंतरावर.

कोणासाठी

१३ ते १९ या वयोगटातील
सर्व मुला-मुलींसाठी.